‘माझ्या वडिलांची बायपास सर्जरी होती त्या दिवशी’ मनवा नाईक ने सांगितला तिचा ‘तो’ अनुभव

अभिनेत्री मनवा नाईक हे नाव मराठी चित्रपटसृष्टीमध्ये कोणाला माहिती नाही. सुरवातीला अभिनेत्री म्हणून करियरला सुरवात केल्यावर हळूच मनवाने निर्माती आणि दिग्दर्शक म्हणून देखील चांगले काम केले आहे. तिने निर्मिती केलेल्या ‘सुंदरा मनामध्ये भरली’, ‘तुमची मुलगी काय करते’, ‘बॉस माझी लाडाची’ या मालिकांनी आपला चांगलाच ठसा उमटवला आहे.

मनवा सांगते की, आयुष्यमाधे नेहमी पहिला अनुभव हा फार महत्वाचा असतो आणि जर पहिला अनुभवच जर खराब आला तर तुम्ही माघार घेता पण माझ्या नशिबाने मला चांगले अनुभव येत गेले आणि म्हनुनच मी चित्रपटसृष्टीमध्ये टिकले. कलाकार म्हणून कामाचा, दिग्दर्शक म्हणून युनिटचा आणि निर्माता म्हणून सर्व बाजूने विचार करत असते म्हणूनच हे सगळे अनुभव फायदेशीर ठरले.

मनवाला आधीपासूनच चित्रपटसृष्टीमध्ये रस होता आणि त्यासाठी तिने सुरवातीपासूनच प्रयत्न देखील केले. अभिनयाची सुरवात करत असताना कामाचे निरीक्षण, बालनाट्य करत असताना सोबतच बॅकस्टेज देखील काम हे सगळे तिने केले. निर्मात्याला आवडणारी सगळी कामे तिने केली होती आणि एक ठराविक अनुभव आला की मग तिने निर्माती म्हणून काम करायचे ठरवले. काही वर्षांपूर्वी पटकथा, प्रेक्षकांचा प्रतिसाद, विषयावर चर्चा असे काहीही नसायचे पण आता सगळेच काही स्पर्धात्मक होऊ लागले आहे.

लोकांना काय आवडतंय आणि काय नाही याविषयी सांगता येत नाही कारण कधी प्रेमकथा आवडणाऱ्याला कधीतरी एखादा अॅक्शनपटही आवडू शकतो आणि म्हणूनच मनोरंजणाच्या क्षेत्रामध्ये एक विशिष्ट फॉर्म्युला वापरता येत नाही आणि दरवेळी ट्रेंड यशस्वी होईल असेही नाही. मनवा हे सगळे काही अगदी मनमोकळेपनाने सांगते आणि या क्षेत्रामधले कामाचे तास कमी व्हायला हवे असे देखील कळकळीने सांगते.

हिन्दी मालिकांमध्ये काम करायचे ठरवून थांबवले का ? या प्राशनवर उत्तर देताना ती सांगते की. एका हिंदी मालिकेत मी काम करत असताना त्या दिवशी  माझ्या बाबांची बायपास सर्जरी होती. पण त्या दिवशी देखील मी सांगूनही मला चित्रीकरणासाठी बोलावले गेले होते. मी जायला नकार दिला आणि त्याच दिवशी ठरवले की जर गरजेच्या वेळी मी कुटुंबाला वेळ देऊ शकत नसेल तर असे काम करायच नाही.

आयुष्य खूप धावपळीमध्ये घालवणे मला जमणार नाही असे देखील मनवा सांगते. लवकरच ती विजय केंकरे यांच्या एका नाटकामध्ये काम करताना दिसणार आहे आणि येत्या काळामध्ये देखील

त्यादिवशीही मला चित्रीकरणासाठी बोलावलं होतं. मी नकार दिला होता. त्यादिवशी मी ठरवलं गरजेच्या वेळी मी माझ्या कुटुंबाला वेळ देऊ शकत नाही, तर मला असं काम करायचं नाही. आयुष्य धावपळीत घालवणं मला जमणार नाही. – ज्येष्ठ रंगकर्मी विजय केंकरे यांच्या आगामी एका नाटकात मी काम करणार आहे. येत्या काळात त्याबाबत अधिकृत घोषणा होईल. स्वत: निर्मिती केलेल्या मालिकेत स्वत: काम करू नये, कारण निर्मात्याला त्या मालिकांबाबतचे खाचखळगे, सखोल विश्लेषण माहिती असतं. एखाद्या कलाकाराला एवढी माहिती असू नये.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button