‘बाहुबली’ आणि ‘RRR’ चे दिग्दर्शक एस. एस राजामौली यांना पडली ‘धर्मवीर’ ची भुरळ

हिन्दीच नव्हे तर संपूर्ण भारतीय सिनेसृष्टीमध्ये क्रांति घडवणारा सिनेमा म्हणजे ‘बाहुबली’. चित्रपटाचा विषय, त्यामध्ये वापरलेले तंत्रज्ञान आणि अभिनय या सगळ्याच बाबतीत हा चित्रपट मैलाचा दगड ठरला. या चित्रपटाचा दूसरा पार्ट तर खूप जास्त गाजला, या दोन्ही चित्रपटच्ये दिग्दर्शक होते ते एस. एस. राजामौली. राजामौलीनी दिग्दर्शित केलेला आणि काहीच दिवसांपूर्वी आलेला चित्रपट म्हणजे ‘आरआरआर’ ! या चित्रपटाने देखील अनेक वेगवेगळे रेकॉर्ड बनवले.

राजमौळी आणि भव्य आणि तितकाच चांगला चित्रपट हे समीकरण जग पहाटे आहे. पण मित्रांनो आजकाल राजामौली यांना एका मराठी चित्रपटाने भुरळ घातली आहे. ‘धर्मवीर मू.पो. ठाणे’ या चित्रपटाचा ट्रेलर आला आणि महाराष्ट्रभर या चित्रपटची चर्चा सुरू झाली आणि याच चित्रपटाचा त्रेयलर हा राजमौळी यांनी आवडला आहे.

धर्मवीरचे दिग्दर्शक प्रवीण तरडे, निर्माते मंगेश देसाई आणि झी स्टुडिओचे व्यवसाय प्रमुख मंगेश कुलकर्णी यांनी नुकतीच राजामौली यांची भेट घेतली त्यावेळी आपल्याला या चित्रपटाचा टीझर प्रचंड आवडला असल्याचे राजामौली यांनी उभयतांना संगितले. या भेटीने प्रवीण तरडे हे भाराऊन गेले होते आणि म्हणाले. “राजामौली सरांना मी कायमच माझा आदर्श मानत आलेलो आहे. त्यांनी दाक्षिणात्य चित्रपट ज्या भव्य दिव्यतेने जगभरात पोहचवला तसंच काही तरी भरीव आपल्याला मराठी चित्रपटाबद्दल करता यावं हीच इच्छा कायम मनात आहे. त्यांना भेटण्याची कायमच इच्छा होती आज धर्मवीरच्या निमित्ताने ती पूर्ण झाली. त्यांनी आमच्याशी अतिशय सहृदयतेने संवाद साधला. काही अनुभव, किस्से आमच्याशी शेअर केले. त्यांच्या या भेटीतून आपला मराठी सिनेमा जगाचा सिनेमा बनवण्यासाठीची एक नवी ऊर्जा आणि प्रेरणा आम्हाला मिळाली.”

निर्माते मंगेश देसाई या भेटीबद्दल म्हणाले की, “जेव्हा बाहुबली चित्रपट बघितला होता तेव्हा कधीच विचार केला नव्हता की बाहुबलीच्या जन्मदात्याला भेटण्याची संधी मिळेल. पण आज तो योग जुळून आला. त्यांना भेटण्यापूर्वी मनात थोडी धाकधूक होती, थोडं दडपण होतं. पण ते जेव्हा समोर आले, आमच्याशी बोलले तेव्हा हे दडपण आपोआप गळून पडलं. चेहऱ्यावर किंवा वागण्यात कसलाही बडेजाव नसलेलं, अतिशय साधं व्यक्तिमत्त्व म्हणजे राजामौली सर हे या भेटीत जाणवलं.”

मंगेश कुलकर्णी या भेटीबद्दल सांगतात की, “चित्रपटाच्या बाबतीत दूरदृष्टी कशी असावी ? कथेच्या बाबतीत व्हिजन कसं असावं? या प्रश्नांचं उत्तर म्हणजे राजामौली सर. त्यांच्या ‘मख्खी’, ‘मगधीरा’, ‘बाहुबली’ ते आता सर्वत्र चर्चेत असलेल्या ‘आरआरआर’ या चित्रपटांचा मी चाहता आहे. प्रादेशिक भाषेतला चित्रपट केवळ त्या भाषांपुरताच मर्यादित न राहता तो जागतिक चित्रपट कसा बनू शकतो हे त्यांनी दाखवून दिलं आहे. आज या भेटीतून या व्यक्तीचं चित्रपटाबद्दलचं प्रेम, या माध्यमावर असलेली हुकूमत हे त्यांच्याशी झालेल्या संवादातून जाणवलं. चित्रपटाचा टिझर त्यांना दाखवला असता ते म्हणाले की ही भाषा जरी मला कळत नसली तरी चित्रपटाचा लुक मला आवडला. कलाकारांचा अभिनय, पार्श्वसंगीत सर्वच उत्तम जमून आलंय. त्यांनी दिलेली ही दाद, ही प्रतिक्रिया आमच्यासाठी फारच मोलाची आहे. त्यांच्याकडून अतिशय सकारात्मक अशी ऊर्जा आम्हांला मिळाली आहे.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button