KGF 2 ची कथा 8 वर्षापूर्वीच लिहली होती; पार्ट 3 येणार का ? काय म्हणाली श्रींनिधी शेट्टी

 सध्या दाक्षिणात्य चित्रपटांची हवा वाहते आहे. दाक्षिणात्य चित्रपट आपल्या अत्यंत सुंदर कथानक आणि अॅक्शनमुळे नेहमीच आपल्याला मोहवत आहे आहेत. पण सुरवातीला हे चित्रपट डब होऊन आपल्याकडे यायचे आणि एखादी शनिवारची रात्र आपण ते आनंदाने पहायचो. नंतर अनेक टीव्ही चॅनेलनी हे मार्केट ओळखून अनेक दाक्षिणात्य चित्रपट दाखवायला सुरवात केली आणि करोडो लोकांपर्यंत हे चित्रपट रोजच पोहचायला सुरवात झाली.

काही दिवसपूर्वी ‘RRR’ आणि आता ‘KGF 2’ या चित्रपटांनी भारतीय सिनेमाच्या लोकप्रियतेचे सगळे रेकॉर्ड मोडून काढले आहेत. ‘केजीएफ’ च्या यशामुळे नायिका श्रीनिधी शेट्टी हिचे देखील नशीब बदलले आहे आणि ती अचानक लाईम लाइट मध्ये आली आहे. श्रीनिधी एका मुलाखतीमध्ये सांगते की, चित्रपट यशस्वी होणार याबाबत खात्री होती पण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हा यशस्वी होईल असे मात्र वाटले नवते.

चित्रपटाचा पहिला भाग खूप लोकप्रिय झाला तेव्हा दिग्दर्शकाने संगितले होते की, दुसर्‍या भागाची कथा देखील अगदी आहे तशीच राहणार आहे आणि त्यांनी दुसर्‍या भागामध्ये देखील कथेमध्ये काहीही बादल केला नाही. त्यांनी या चित्रपटाची गोष्ट 8 वर्षापूर्वी लिहली होती आणि चित्रपटाचा मूड देखील त्यांनी बदलला नाही. श्रीनिधीची भूमिका देखील अगदी आहे तशीच राहिली.

श्रीनिधी पुढे सांगते की, आमच्याकडे भाग 3 बद्दलची काहीही माहिती नाही आणि याबद्दल अनेक गुपिते आहेत आता हे पाहणे रंजक ठरेल की भाग 3 किती वर्षांनी आपल्यापुढे येईल पण भाग 3 हा नक्की येईल हे देखील तिने संगितले.

श्रीनिधी हिचा जन्म 1992 मध्ये कर्नाटक मध्ये झालेला आहे आणि ती अनेक वर्षे मोडेल म्हणून काम करत होती. 2016 साली तिला मिस दिवा सुपरानॅशनल हा पुरस्कार देखील मिळाला होता. तिने आपले शिक्षण अभियांत्रिकी मधून पूर्ण केले आणि मग 2012 मध्ये आपल्या मॉडेलिंगच्या करियरला सुरवात केली. 2018 साली आलेल्या ‘KGF’ या चित्रपटामधून तिने पदार्पण केले आणि तिचा पहिलाच चित्रपट हा खूप जास्त यशस्वी ठरला. कोब्रा या तामीळ चित्रपटामध्ये देखील ती लवकरच दिसणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button