नुसरत भरुचाने चक्क रस्त्यावर विकलेत ‘कंडोम’, विकताना म्हणायची ‘जनहित मे जारी’

हिन्दी चित्रपटसृष्टीमधील आघाडीची नायिका नुसरत भरुचा ही आपल्या आगामी चित्रपटच्या निमित्ताने पुन्हा चर्चेमध्ये आहे. नुसरतने आपल्या अभिनय आणि सौंदर्यामुळे चाहत्यांच्या मनात आपले वेगळे असे स्थान निर्माण केलेले आहे. काही दिवसांपूर्वीच तिचा ‘छोरी’ नावाचा चित्रपट आला होता. भीतीदायक अशा सिनेमांच्या चाकोरीमध्ये असलेल्या या सिनेमामध्ये एका समस्येवर देखील भाष्य करण्यात आले होते. लवकरच तिचा ‘जनहित मे जारी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

‘जनहित मे जारी’ या चित्रपटाचे पोस्टर आणि टिझर रिलीज झालेले आहेत आणि या मध्ये नुसरत ही चक्क कंडोमचा प्रचार प्रसार करताना दिसत आहे. चित्रपटाचा टिझर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे आणि प्रेक्षकांचा देखील चांगला असा प्रतिसाद या टिझरला मिळताना दिसत आहे.

चित्रपटामध्ये नुसरत ही एका सेल्सवुमेणची भूमिका करताना दिसत आहे. टिझरच्या अगदी सुरवातीलाच ती म्हनतेय ‘रात रंगीन, मजे, प्लेजर… हेच सगळे पाहून आपण 40 कोटींचे 140 कोटी झाले आहोत’ टिझरमध्ये ती दुकानापासून रस्त्यावरील प्रत्येक माणसाला कंडोम विकण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. टिझर मध्ये एक वयोवृद्ध नुसरतला म्हणतोय ‘तिसर्‍या माळ्यापर्यन्त चढू शकशील ?’ तेव्हा नुसरत म्हणते ‘चाचा आमच्या कंपनीचा कंडोम आहे आणि त्याचा मी प्रचार करतेय’

टिझरला शेअर करत नुसरतने कॅप्शन लिहीलंय की,”या सेल्सवुमनची स्टोरी आपले विचार बदलेल. ‘जनहित में जारी’ चा ट्रेलर दोन दिवसातच रिलीज होईल. याआधी नुसरतने सिनेमाचा एक पोस्टर शेअर करताना लिहिलं होतं की,”आजपर्यंत तुम्ही मोठमोठे सिनेमे पाहिले असतील. पण आता वेळ आहे या वूमनियाची,जी घेऊन येणार आहे एक मोठी आयडिया. जनहित में जारी सिनेमा १० जूनला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे”.

‘जनहित में जारी’ सिनेमाचं दिग्दर्शन जय बंटू सिंगने केलं आहे आणि सिनेमाचं कथानक राज शांडिल्यचं आहे. या सिनेमात नुसरत भरूचासोबत पावेल गुलाटी मुख्य भूमिकेत काम करताना दिसणार आहे. सिनेमात विजय राज ही महत्त्वाच्या भूमिकत दिसणार आहे. बॉलीवूड अभिनेत्री नुसरत भरुचाचा ‘जनहित में जारी’ सिनेमा १० जूनला प्रदर्शित होत आहे. सोशल मीडियावर नुसरतने हटके अंदाजात याचं प्रमोशनही सुरू केलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button