संजय दत्तच्या बायकोसोबत ‘लिव्ह इन’ मध्ये, आता युवराजच्या गर्लफ्रेंडसोबत लग्न ! कोण आहे ‘हा’ खेळाडू ?

सध्या लग्नाचा सीझन चालू आहे. कतरीना विकी कौशल, रणबीर-आलिया अशा अनेकांनी आपले शुभमंगल उरकून घेतलेले आहे आणि आता एक अजून एक जोडी लग्नाच्या बेडीमध्ये अडकणार असल्याची माहिती आली आहे. एक प्रसिद्ध खेळाडू आणि दुसरी बॉलीवूड अभिनेत्री अशी ही जोडी आहे. मिळणार्‍या माहिती नुसार टेनिसपटू लिएंडर पेस आणि अभिनेत्री किम शर्मा हे दोघे लग्न करणार आहेत. गेली अनेक वर्षे हे दोघे एकमेकांच्या प्रेमात बुडालेले आहेत आणि लवकरच दोघे लग्न करणार असल्याची माहिती आहे.

पेस आणि किम यांच्या लग्नाची तयारी सुरू झाल्याची माहिती देखील अनेक वृत्तपत्रांनी दिलेली आहे. लिएंडर पेस हा प्रसिद्ध टेनिसपटू आहे आणि भारतासाठी त्याने दुहेरी मध्ये दैदीप्यमान कामगिरी केली आहे. महेश भूपती आणि लिएंडर पेस ही जोडी जागतिक टेनिस क्रमवारी मध्ये बराच काळ पहिल्या क्रमांकावर राहिलेली आहे.

पेस आणि किम यांनी काही दिवसपूर्वी दोघांचे अफेयर ऑफिशियल केले होते. आजकाल दोघे एकमेकांच्या सोबताचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहे. दोघेही लवकरच लग्न करणार आहेत आणि लग्नाची तयारी देखील चालू आहे. दोघांच्या कुटुंबियांनी देखील या लग्नाला मान्यता दिल्याचे सांगण्यात येत आहेत. दोघेही कोर्ट मेरेज करणार आहेत. एका सूत्रानुसार पेसचे आई वडील मुंबईमध्ये आले असून त्यांनी मग किमच्या कुटुंबियांची देखील त्यांच्या घरी भेट घेतली आणि त्यानंतर लग्नाचा बार लवकरच उडणार असल्याचे सगळ्यांच्या लक्षात आले.

किम शर्मा आणि लिएंडर पेस हे दोघेही त्यांच्या भुतकाळामधल्या रिलेशनशिप मुळे चांगलेच चर्चेमध्ये राहिले आहेत. किम शर्माचे नाव अनेक दिवस युवराज सिंह याच्याशी जोडले गेले होते आणि या नात्याची चांगलीच चर्चा झाली होती. त्यानंतर हर्षवर्धन राणे याच्यासोबत देखील तिचे नाव जोडले गेले होते. दोघांसोबत देखील तिच्या अफेयरच्या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या.

दुसरीकडे लिएंडर पेस हा अनेक वर्षे संजय दत्तच्या बायकोला डेट करत होता. संजय दत्तच्या बायकोसोबत अनेक वर्षे लिएंडर पेस हा लिव इन रिलेशनशिप मध्ये देखी राहत होता. दोघे एकमेकांच्या सोबत राहत होते आणि या दरम्यान संजय दत्तच्या बायकोने त्याच्यावर घरगुती मार हाणीचा एक गुन्हा देखील दाखल केला होता. रिया पिल्ले सोबतच्या नात्यानंतर लिएंडर आणि किम शर्मा यांचे सूत जुळले.

लिएंडर आणि किम शर्मा हे खूप जास्त काळ एकमेकांच्या सहवासामध्ये नाहीयेत. या अफेयरला वर्षाच्या वर थोडा वेळ झालेला आहे कारण दोघांनी या मार्च महिन्यात त्यांच्या नात्याची पहिली अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट केली. पहिल्या अॅनिव्हर्सरीनिमित्त किम आणि लिएंडर दोघांनीही एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत खास पोस्ट टाकली होती. या फोटोंमध्ये दोघेही एकमेकांसोबत एन्जॉय करताना दिसत होते. लिएंडर आणि किमने त्यांचं नातं ऑफिशिअल केल्यानंतर या दोघांची बरीच चर्चा झाली होती. शिवाय या दोघांच्या वयाबद्दल बोलायचं झाल्यास लिएंडर वयाच्या पन्नाशीत लग्न करतोय, असंच म्हणावं लागेल. कारण लिएंडर 48 वर्षांचा असून किम शर्मा 42 वर्षांची आहे.आता लिएंडर आणि किम यांच्या लग्नाच्या चर्चा या खऱ्या असतील, तर दोघेही लवकरच लग्नाची तारीख जाहीर करतील, असं म्हटलं जातंय.

Exit mobile version