भोंगा चित्रपट : चित्रपटगृहामधून भोंगा काढला; मनसे नेत्यांच्या तीव्र प्रतिक्रिया

2018 सालच्या 66 व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यामध्ये एका चित्रपटाला बेस्ट मराठी फीचर फिल्म म्हणून पुरस्कार मिळाला होता चित्रपटाचे नाव ‘भोंगा’. होय भोंगाच ! राज ठाकरे आणि मनसे या त्यांच्या पक्षाने जो मुद्दा उचलला आहे अगदी त्याच मुद्दयाशी थोडासा सुसंगत हा चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये एक छोटे बाळ आजारी असल्याचे दाखवले गेले आहे, ज्याचे मुस्लिम आई-वडील त्याचा हा आजार कमी व्हावा म्हणून भोंग्याच्या आवाजाच्या विरोधात दिसतात.

तर या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘भोंगा’ चित्रपटाची कथा सामाजिक विषय हाताळणारी असून आणि त्याच प्रकारे चित्रपटाला आजकाल चाललेल्या विषयांमुळे राजकीय कलाटणी मिळत असल्याचे देखील म्हटले जात आहे आणि ‘भोंगा’ या चित्रपटची सर्वत्र चर्चा चालू आहे. अमोल कागणे फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती दिग्दर्शक शिवाजी लोटन (Marathi Film) पाटील, अर्जुन हिरामण महाजन, अमोल लक्ष्मण कागणे यांनी केली असून या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी सांभाळली.

मुंबई, पुणे, सातारा मधील काही चित्रपटगृहामध्ये या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटावर पोलिसांकडून बंदी घालण्यात आली असल्याचे समोर आले आहे. सामाजिक विषयाची मांडणी करणाऱ्या आणि राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अशा या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालणे ही नक्कीच वाईट अशी गोष्ट आहे आणि सामाजिक चित्रपट राजकीय दृष्टीकोनामधून हाताळला जात असल्याचे दिसत आहे.

‘जो चित्रपट राष्ट्रीय पुरस्कार सन्मानित आहे, सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र मिळालेला आहे, तो भोंगा चित्रपट थिएटरमधून काढायला लावणे हे पोलिसांच्या कोणत्या अधिकारात बसत? राज्यसरकार हुकूमशहा सारखं वागतंय, भोंगा चित्रपट थिएटरमधून काढायला लावतायत. पोलिसांना बेकायदेशीर काम करायला स्वतः गृहखातं सांगतय.’ अशा आशयाचे ट्विट अमेय खोपकर यांनी केले आहे.

तर चित्रपटाचे निर्माते अमोल लक्ष्मण कागणे यांनीही या प्रकाराबद्दल खंत व्यक्त करत असे म्हटले की, ‘सामाजिक विषय हाताळणाऱ्या कथेला राजकीय स्वरूप देणे हे अत्यंत चुकीचे आहे. शिवाय राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित अशा चित्रपटाचा हा अपमान आहे असं मला वाटतं. मराठी चित्रपटांना थिएटर मिळणे, प्राईम टाईम मिळणं ही सर्वात मोठी बोंब असून मराठी चित्रपटनिर्माता स्वतःचे १००% देऊन चित्रपट निर्मिती करतो. जर सरकारने वा पोलीसांनी महाराष्ट्रातच मराठी चित्रपटांना सहकार्य नाही केलं तर मराठी माणूस कुठे दाद मागणार? मराठी चित्रपटांना सपोर्ट नाही केलं तर मराठी भाषा टिकेल असे मला वाटते, नाहीतर मराठी चित्रपटाचं मार्केट आणि अस्तित्व बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी खाऊन टाकायला वेळ नाही लागणार.’

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button