KGF 2 : 10 वर्षांपूर्वी जबरदस्त आपटला होता ‘रॉकी’, इतका की यश देखील या बाबतीत कधी बोलत नाही

गेली चार वर्षे अनेक चाहते यश उर्फ रॉकी भाईची वाट पाहत आहेत आणि गेल्या 14 एप्रिलला त्यांचे वाट पाहणे संपले. केजीएफ चॅप्टर 2 हा 14 एप्रिल ला प्रदर्शित झाला आणि मग बॉक्स ऑफिसवर ताबडतोड कमाई सुरू झाली. पाहिल्याच दिवशी या चित्रपटाने 40 कोटींपेक्षा देखील जास्त व्यवसाय केला आणि पहिल्या चार दिवसांमध्ये 200 कोटींपेक्षा जास्त कमाई या चित्रपटाच्या हिन्दी वर्जननेच केली आहे. हिन्दी चित्रपटांमध्ये पहिल्या चार दिवसात सर्वाधिक कमाई करणारा हा क्रमांक 1 चा चित्रपट बनला आहे. बाहुबली 2 ला मागे टाकत केजीएफने ये दिव्य केले आहे.

चार दिवसांमध्ये संपूर्ण जगभरामध्ये या चित्रपटाने 500 कोटींच्यापेक्षा अधिक पैसे कमावले आहेत आणि जगभरामध्ये हा दुसर्‍या क्रमांकावर आहे. पण तुम्हाला माहिती आहे का ? ज्या ‘रॉकी’ च्या जिवावर केजीएफ इतका उडत आहेत त्याच ‘रॉकी’ने यश ला पार रस्त्यावर आणले होते.

2008 मध्ये यशचा एक चित्रपट आला होता. चित्रपटाचे नाव होते ‘रॉकी’ आणि या चित्रपटामध्ये केजीएफ सारखाच यश ‘रॉकी’ ही भूमिका करत होता. यशचा हा चित्रपट काहीही करू शकला नाही आणि चांगलाच आपटला. रॉकी हा चित्रपट एक कन्नड रोमेंटिक चित्रपट होता ज्याला नागेंद्र यांनी दिग्दर्शित केले होते. बॉक्स ऑफिसवर चित्रपट तर आपटलाच पण समीक्षकांनी देखील चित्रपटावर चांगलेच ताशेरे ओढले होते.

एक चॉकलेट बॉय बनून यश सगळ्यांच्या समोर आले होते पण लोकांना यश अजिबात आवडले नाही आणि 5 कोटी रुपये खर्चून बनलेला हा चित्रपट चांगलाच आपटला. पण 10 वर्षांनंतर यश पुन्हा रॉकी बनून सर्वांसमोर आला आणि जगभरात कोट्यवधी फॅन्स बनवले.

जुन्या रॉकीला चित्रपटामध्ये उषा सोबत प्रेम होते आणि कॉलेजमधेच त्यांची आणि तिची भेट होते. रॉकी एकतर्फी प्रेमात पडतो पण उषाचे प्रेम मात्र दुसर्‍या कुणावर तरी असते. उषा ज्याच्यावर प्रेम करते तो एक डॉनचा छोटा भाऊ असतो आणि जेव्हा रॉकीला या बाबतीत कळते तेव्हा तो दोघांना एकत्र आणायचा प्लान बनवतो. आणि मग गोष्ट एका वेगळ्या ट्रॅकवर जायला सुरवात करते. उषा पण आता हळूहळू यशच्या प्रेमात पडायला लागते आणि अशावेळी यश दोघांच्या नात्यामध्ये फुट पडायचा प्रयत्न करतो. ट्विस्ट आणि टर्न्स येत राहतात पण चित्रपट चांगलाच आपटतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button