‘शेर शिवराज’ मिळवला अजून एक बहुमान; ट्रेलरने केले असे काही की, होतेय चर्चा

तंत्रज्ञान हा आज आपल्या जीवनामधला एक अविभाज्य घटक बनलेला आहे आणि आपल्या आयुष्यामधल्या अनेक गोष्टी खूप सुलभतेने होत आहेत याच्यामागे तंत्रज्ञान हे आहे. काही दिवसापासून, म्हणजेच जेव्हापासून तुमच्या व्हाट्सअपच्या खाली मेटा नाव दिसायला लागले आहे तेव्हापासून आपण मेटाव्हर्स या संकल्पनेबद्दल ऐकत आहोत.

मेटाव्हर्स म्हणजे एक प्रकारची आभासी दुनिया ! आभासी दुनिया तयार करून त्या द्वारे संवाद आणि अनेक वेगवेगळ्या गोष्टी करणे म्हणजे मेटाव्हर्स. कदाचित ही तंत्रज्ञांनाची नवीन पिढी असेल. वेब 3.0 मध्ये मेटाव्हर्स, 5G, ब्लॉकचेन, व्हार्चुयल रियाळीती आणि अनेक संकल्पनाचा समावेश होतो. मनोरंजन क्षेत्र देखील याला अपवाद नाहीये.

सध्या शिवराज अष्टकमधले चतुर्थ पुष्प म्हणजे ‘शेर शिवराज’ हा चित्रपट लवकरच येत आहे आणि या चित्रपटाचा ट्रेलर मेटाव्हर्सच्या माध्यमामधून दाखवण्यात आला. मराठी चित्रपटामधला हा असा पहिलाच प्रयोग आहे. मुंबई मुवी स्टुडियोज आणि यूएफओ चित्रपट यांनी ‘शेर शिवराज’ या चित्रपटाकरता मेटावूड सोबत भागीदारी केली आणि आणि मग तंत्रज्ञांनाचा वापर करत हा चित्रपटाचा ट्रेलर आपल्या सर्वांच्या पुढे आला.

तंत्रज्ञानाद्वारे ट्रेलर प्रदर्शित करण्याचा बहुमान ‘शेर शिवराज’ चित्रपटाने मिळवला असून आमच्या सर्वांसाठी ही आनंदाची बाब असल्याचे लेखक –दिग्दर्शक दिगपाल लांजेकर, अभिनेते चिन्मय मांडलेकर , समीर धर्माधिकारी, अभिनेत्री माधवी निमकर, निर्माते नितीन केणी यांनी यावेळी सांगितले. हे तंत्रज्ञान भविष्यात माणसांचे आयुष्य बदलून टाकेल असा विश्वास निर्माते नितीन केणी यांनी व्यक्त केला. एनएफटी या टेक्नोलॉजीद्वारे या चित्रपटाच्या आठवणी डिजीटली संग्रहित होणार आहे. NFT चा अर्थ Non Fungible Token ही एकप्रकारची डिजीटल संपत्ती आहे. याला ब्लॉकचेन टेक्नोलॉजीद्वारे हाताळले जाते. या टेक्नोलॉजीच्या मदतीने जीआयएफ, फोटो, व्हिडिओ क्लिप्स, पेटिंग डिजीटल संपत्तीची मालकी निश्चित होते.

आजची तरुणपिढी ही खूप टेक्नोसॅव्ही आहे, तंत्रज्ञानातील बदलानुसार आपणही बदलत राहायला हवे याची त्यांना जाणीव आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून इतिहासाचे प्रत्येक पैलू उलगडण्याचा हा प्रयत्न नक्कीच स्तुत्य आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button