घटस्फोट होऊन देखील झाले नाहीत वेगळे, टॅटूमुळे वैतागली सामंथा.. म्हणाली

दाक्षिणात्य अभिनेत्री सामंथा रूथ प्रभू ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. दाक्षिणात्य तसेच बॉलिवूड मध्ये देखील सामंथा कोणत्या न कोणत्या कारणामुळे लोकांच्या चर्चेचा विषय असते. कधी तिच्या फिगर मुले तर कधी तिच्या कामामुळे पण आता सामंथा तिने काढलेल्या तिच्या टॅटूमुळे चर्चेच भाग ठरली आहे. गेल्या वर्षी सामंथा तिच्या नागा चैतन्या सोबतच्या घटस्फोटामुळे चर्चेत आली होती. त्यांच्या वेगळे होण्याने मात्र चाहते खूप नाराज झाले आहेत आणि ते पुन्हा एकत्र येतील या आशेवर आहेत परंतु यावर सामंथा हिने पुन्हा एकत्र येण्यास पूर्ण नकार दिला.  

इनस्टाग्रामवरती सामंथाने नुकताच आपल्या फॅनसोबत संवाद साधला.  त्यात तिने  ‘ask me anything’ अशी पोस्ट केली होती. त्यात तिला एका चाहत्याने तिच्या टॅटूबद्दल प्रश्न केला की ‘तू आता नवीन टॅटू करण्याच्या विचारात आहेस का?’ त्यावर सामंथा ने नाही असे उत्तर दिले आणि त्यावर ती अशी ही म्हणाली की माझ्या पेक्षा वयाने  लहान असणार्‍या लोकांसाठी मला एक गोष्ट सांगायची आहे की “कधीच आयुष्यात टॅटू  काढू नका. कधीच नाही. कधीही कोणता ही टॅटू काढू नका.”

सामंथा ने नागासाठी तीन टॅटू बनवले होते. त्यात तिने पहिला टॅटू पाठीवर काढला होता ज्यामधे वायसीएम असे लिहिले. हा टॅटू सामंथा ने नागा चैतन्याच्या ‘ये माया चेसवे’ या पहिल्या चित्रपटाच्या नावावरून काढण्यात आला होता. याशिवाय सामंथा ने तिच्या कमरेवर देखील टॅटू काढला होता ज्यामधे नागा चैतन्यचे टोपणनाव ‘चाय’ लिहिलेले आहे. याशिवाय सामंथा आणि नागाने मनगटावर सारखाच एक टॅटू काढला आहे.

2017 मध्ये सामंथा आणि नागा चैतन्यने लग्न केले. परंतु गेल्या वर्षी त्यांनी घटस्फोट घेतला आणि वेगळे झाले. नुकताच अभिनेता अल्लू अर्जुनच्या पुष्पा चित्रपटातिल ‘ओ अंतवा’ या आयटम सोंगवरती सामंथा हिने काम केले आहे. आता चाहते तिच्या नवीन चित्रपटची वाट पाहत आहेत. हिन्दी चित्रपटामध्ये तिला पाहण्यासाठी देखील ते उत्सुक आहेत. सामंथा सुपरहिट वेब सेरीज ’फॅमिली मॅन 2’ मध्ये मनोज बजपेयीसोबत खलनायकाच्या भूमिकेत दिसली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button