‘ड्युरेक्स’ कंपनीने दिल्या रणबीर-आलियाला दिल्या लग्नाच्या अशा ‘Quirky’ शुभेच्छा

कपूर घराण्याचा वंशज रणबीर कपूर आणि भट्ट घराण्यातली आलिया यांचा विवाह 14 एप्रिलला रणबीरच्या पाली हिल मधल्या घरामध्ये पार पडला. लग्नाची चर्चा महिनाभरापासून चालू होती आणि अखेर लग्नाची गाठ बांधत दोघांनी साता जन्माच्या आणाभाका घेतल्या. सध्या लग्नामधल्या अनेक गोष्टी आणि फोटो चांगल्या व्हायरल होत आहेत. अशामध्ये एक वेगळ्या आणि अत्यंत लक्ष वेधून घेणार्‍या शुभेच्या एका कोंडोम कंपनीनि दिल्या आहेत. एका वेगळ्या अशा पोस्ट सहित त्यांनी एक मजेशीर पोस्ट शेअर केली आहे.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे गेली अनेक वर्षे एकमेकांच्या संबंधामध्ये आहेत आणि 2015 पासून ते दोघे एकमेकांना देत करत आहेत पण सोनम कपूरच्या लग्नामध्ये हे दोघे सगळ्यांच्या समोर एकत्र आले आणि सगळ्यांच्या पुढे त्यांचे हे गुपित फुटले. दोघांच्या विषयीच्या अनेक गोष्टी सुरू झाल्या आणि काही दिवसापूर्वी हे दोघे देवा ब्राह्मनांच्या साक्षीने एकत्र आले.

हा शुभ प्रसंगी सोनम कपूर, जेनेलिया डिसूजा, माधुरी दीक्षित, टाइगर श्रॉफ, तमन्ना भाटिया, जान्हवी कपूर, अनिल कपूर, सोनू सूद, दीया मिर्जा, मौनी रॉय, मनीष मल्होत्रा, कतरीना यासांरख्या अनेक सेलिब्रेटींनी सोशल मीडियावरून त्यांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. पण एका काँडम कंपनीने म्हणजे ‘ड्युरेक्स’ या कंपनीने दिलेल्या शुभेच्छा सर्वांच्या लक्षात राहणाऱ्या आहेत.

ड्युरेक्सच्या पोस्ट आणि त्यांचे अनेक वेगळे असे सोशल मीडिया कॅम्पेन हा नेहमीच चर्चेचा विषय बनलेला आहे आणि पुन्हा एकदा रणबीर आणि आलियाच्या ल्गनाच्या निमित्ताने त्यांनी हे दाखवून दिले आहे. रणबीर आलियाच्या लग्नावर एक खास पोस्ट त्यांनी लिहिली आहे. आपल्या या पोस्ट मध्ये त्यांनी रणबीर कपूरयाच्याच चित्रपटामधल्या एका गाण्याचा भाग वापरला आहे. ‘चन्ना मेरेया’ या गाण्यावरच्या काही ओळींचा वापर करत त्यांनी लिहले की, डियर रणबीर आणि आलिया, महफिल में तेरी हम ना रहे जो, फन तो नहीं है,’ अशी पोस्ट त्यांनी इंस्टाग्राम वर शेअर केली आहे. या पोस्टची भरलीच चर्चा रंगली अजून अनेकजण त्यावर प्रतिक्रिया देत आहेत. या पोस्ट मध्ये रणबीर आणि आलियाला टॅग केल्याने आता ते यावर काही प्रतिक्रिया देणार का याकडे अनेकांचे लक्ष आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button