निळू फुलेंची मुलगी कधी पाहिली का ? मोठी झालीय आणि आजकाल करतेय ‘हे’ काम

‘बाई वाड्यावर या’ त्यांच्या काही संवादांवर आजही तरुणाई मरते आणि हजारो मिम्स रोज बनतात. त्यांच्या डायलॉग बाजीची क्रेझ आजही सगळीकडे आहे असे हरहुन्नरी खलनायक म्हणजे निळू फुले. निळू फुलेंच्या खलनायकाची बरोबरी आजपर्यंत हॉलीवूडकरांनाही करता आली नाही. निळू फुले यांनी त्यांच्या कार्यकिर्दीमध्ये अनेक भूमिका सकारल्या आणि रसिकांचे मनोरंजन देखील मोठ्या प्रमाणामध्ये केले. 2009 साली निळू दादांनी या जगाचा निरोप घेतला असला तरी त्यांच्या अजरामर भूमिकांनी ते आजही आपल्या सगळ्यांच्या मध्ये आहेत.

निळू फुले यांच्या खासगी आयुष्याविषयी फार कमी गोष्टी लोकांपर्यंत पोचलेल्या आहेत. तुम्हाला कदाचित हे ऐकून आश्चर्य वाटेल की निळू फुले यांना एक मुलगी देखील आहे आणि ती मुलगी चांगली प्रसिद्ध अभिनेत्री देखील आहे. निळू फुले यांच्या लेकीचे लग्न झालेले आहे त्यामुळे आपण त्यांना गार्गी थत्ते या नावाने ओळखतो.

गार्गी यांचे लग्न झाल्यामुळे त्यांचे आडनाव फुले वरुन थत्ते झाले. गार्गी यांना आपण अनेक टीव्ही सिरियल मधून पाहिले आहे. गार्गी यांनी कट्ट कट्ट कडाकडू, मसाला, चिकटगुणडे अशा अनेक मराठी चित्रपटांमध्ये देखील महत्वाच्या भूमिका सकारल्या आहेत. आपल्या वडिलांचा अभिनयाचा वारसा तर त्या चालवतच आहेत त्याच बरोबर समाजसेवेचा वारसा देखील त्यांनी घेतला आहे आणि अनेक समाजकार्यामध्ये त्या आघाडीवर दिसतात.

निळू फुले यांच्यानंतर गार्गी यांनी मोठ्या पडद्यावर दिसावे असे अनेकांची इच्छा होती पण त्या मात्र मोठ्या पडद्यापेक्षा जास्त छोट्या पडद्यावरच रमल्या. 2007 साली निळू फुलेंनी त्यांचे लग्न लावून दिले. ओंकार थत्ते यांच्याशी गार्गी यांचा विवाह झाला आणि दोघांना एक अपत्य देखील आहे.

‘तुला पाहते रे’ या मालिकेमध्ये गार्गी चांगल्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाल्या होत्या. एक कलाकार म्हणून निळू फुले हे ग्रेट होते पण एक माणूस म्हणून ते इतरांचे आदर्श होते आणि हीच शिकवण गार्गी यांनी जोपासली आहे. आपल्याला शक्य तितक्या परीने गार्गी या त्यांचा वारसा पुढे चालवत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button