युसुफ इब्राहीम कोण आहे ? आलियाच्या लग्नाशी का जोडला जातोय संबंध

आलिया आणि रनबिर कपूर यांचे लग्न हा आजचा चर्चेचा विषय आहे. आज 14 एप्रिल 2022 रोजी हे दोघे लग्नाच्या बेडीमध्ये अडकले. दोघांच्या लग्नाशी जोडलेल्या प्रत्येक गोष्टीची चर्चा आपल्याला आज पाहायला मिळत आहे. लग्नाच्या ठिकाणापासून ते जेवायला काय होते हे सगळे आपल्याला मीडियाने संगितले आहे.

लग्न हे मुंबईमधेच होत असल्यामुळे कडक सुरक्षा असणार हे जवळपास नक्की होते आणि तब्बल 200 बाऊन्सर्स आणि पोलिस तैनात केलेले होते. इतकी कडक सुरक्षा असली तरीही गोंधळ उडताना मात्र दिसला आणि याचे कारण म्हणजे खूप जास्त गर्दी हे होते. इतकी जास्त गर्दी असल्यानंतर देखील काही घडले नाही याचे श्रेय बाऊन्सर्सला द्यायला काहीही हरकत नाही आणि यामध्ये एक प्रसिद्ध नाव म्हणजे युसुफ इब्राहीम याचे.

आता तुम्ही म्हणाल की, हा युसुफ इब्राहीम हा कोण ? आणि याचे नेमके आलिया रनबिर सोबत नक्की काय संबंध. तर हा युसुफ इब्राहीमच ज्याच्यावर संपूर्ण सुरक्षेची जबाबदारी होती. युसुफ हा आलियाच्या जवळचा माणूस आहे आणि अनेक कार्यक्रमांना हजार असतो. तिच्या सुरक्षेची जबाबदारी पेलताना. युसुफ हा ९११ या सिक्युरिटी एजन्सीमध्ये पार्टनर आहे. आलिया भट्टचा सावत्र भाऊ राहूल भट्टने युसुफ लग्नाची सुरक्षा व्यवस्था पहाणार आहे असे याआधी स्पष्ट केले होते. युसुफनं आपल्या कंपनीच्या जवळजवळ २०० बाऊन्सर्सना या लग्नसोहळ्यासाठी तैनात केलं होतं. राहुल भट्टनं त्याच्या टीममधीलही काही मुलांना सुरक्षा व्यवस्था पाहण्यासाठी युसुफकडे पाठवलं होतं असं तो म्हणाला.

पाहुण्यांच्या सुरक्षेसाठी खास ड्रोन कॅमेरा आणि पेट्रोलिंग करणाऱ्या ऑफिर्सचीही लग्नात सोय करण्यात आली होती. आलिया रणबीरला त्यांच्या लग्नात खास बाऊन्सर्स हवे होते,जे धुम्रपान करणारे नसतील,त्यांची पर्सनॅलिटी चांगली असेल,वागण्या-बोलण्यात संयम अन् मृदुता असणारे असतील. युसुफ आणि त्याच्या ९११ टीमनं वरुण धवनच्या लग्नातही अलिबागला सुरक्षेची जबाबदारी पेलली होती. युसुफ हा सिक्युरिटी कन्सलटंट आहे. शाहरुख खान,करण जोहर,दीपिका पदूकोण,शाहिद कपूर,कतरिना कैफ,रणबीर कपूर आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्यासाठीही युसुफ सिक्युरिटी व्यवस्था पाहतो. आलिया सोबत अनेकदा प्रमोशनच्या निमित्तानं किंवा ती ट्रॅव्हल करताना युसुफ दिसतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button