तुम्हीच तर माझे आणि माझ्या बायकोचे अभिनंदन केले होते, ढोंगीपना उघड तरीही … विवेक अग्निहोत्रींचे शरद पवारांला उत्तर

विवेक अग्निहोतरी यांनी ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट दिग्दर्शित केला आणि थंड सुरवातीनंतर चित्रपटाची कथा ऐकून लोकांनी चित्रपटपाहण्यासाठी सांगा लावल्या आणि इतिहास घडला. चित्रपट आजही एक महिन्यानंतरही सिनेमागृहामध्ये जाऊन लोक पाहत आहेत. पण चित्रपटामुळे राजकारण देखील चांगलेच तापलेले आहे आणि या दरम्यान शरद पवार यांनी या चित्रपटाबद्दल एक वक्तव्य केले आहे. ‘सत्तेतील लोकच या चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत, हे दुर्दैव आहे’
विवेक अग्निहोत्री यांनीही मग शरद पवारांना ट्विट करत सडेतोड उत्तर दिले आहे. विवेक अग्निहोत्री लिहितात की, “या व्यक्तीचे नाव विवेक रंजन अग्निहोत्री आहे. काही दिवसांपूर्वी जो तुम्हाला विमानात भेटला होता, त्या माणसाने तुमच्या आणि तुमच्या पत्नीच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेतला होता तेव्हा तुम्ही काश्मिरी हिंदूंच्या नरसंहारावर सर्वोत्कृष्ट चित्रपट बनवल्याबद्दल या व्यक्तीचे आणि त्याच्या पत्नीचे अभिनंदन केले होते,” अशी भेटीची आठवण देखील अग्निहोत्री यांनी त्यांना करून दिली.
शरद पवारांनी नुकत्याच एका मुलाखतीविषयी ट्विट करून माहिती दिली होती. या दरम्यान शरद पवारांनी काश्मिरी फाइल्स चित्रपटावर निशाणा साधला होता. पवार म्हणतात की, एका माणसाने चित्रपट बनवला असून त्यात असंख्य हिंदूंवर होणारे अन्याय दाखवले आहेत. या चित्रपटामध्ये दाखवले आहे की, बहुसंख्य नेहमीच अल्पसंख्यांकावर हल्ले करतो आणि जेव्हा मुस्लिम हे बहुसंख्य असतात तेव्हा हिंदू समाज असुरक्षित होतो. सत्तेमधले लोक या चित्रपटाचे प्रमोशन करताहेत हे दुर्दैव आहे.’
पवारांच्या या ट्विटला उत्तर देताना अग्निहोत्र लिहतात, काही दिवसांपूर्वी मी आणि माझी बायको एका विमान प्रवासामध्ये शरद पवार आणि त्यांच्या बायकोला भेटलो आणि त्यांच्या पाया देखील पडलो. दोघांनी माझे आणि पल्लवी जोशी हिचे चित्रपटाबद्दल अभिनंदन केले आणि आशीर्वाद देखील दिले. मीडियासमोर नेमके काय झाले माहिती नाही. ढोंगीपणा उघडा पडला आहे तरीही मी त्यांचा आदर करतो असे देखील त्यांनी पुढे म्हटले.
11 मार्च रोजी ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. अवघ्या 12 कोटींच्या निर्मिती खर्चात तयार झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 250 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे. या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, दर्शन कुमार, मृणाल कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.